गुमी/ कोरिया : आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेत शनिवारी भारताचा भालाफेकपटू सचिन यादव याने शानदार कामगिरी करत रौप्यपदकाला गवसणी घातली. त्याच्या या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे. तर अवघ्या २५ वर्षांचा असणारा सचिन यादव याने सर्वोत्तम कामगिरी करत ८५.१६ मीटर अंतरावर भाला फेकला. सचिन यादव हा मुळचा उत्तर प्रदेशातील खेकरा जिह्यातील आहे. सचिन यादव याने यापुर्वी केलेला स्वत:चा ८४.३९ मीटरचा विक्रम मोडला.
Fans
Followers